कौतुकास्पद : जिल्हा मराठा विद्या प्रसारक देणार ५० लाखांचा निधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नामांकित असलेल्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी.डी. खानदेशी यांनी दिली. संस्थेचे विश्वस्त, कार्यकारणी, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व मिळून हा निधी देणार आहेत.

कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्यांसह कष्टकरी, शेतकऱ्यांवरही संकट ओढवले असून अशावेळी सर्वांनी सरकारच्या पाठीशी उभे राहणे व सर्वसामान्य माणसाला दिलासा देणे आवश्यक आहे. या बांधिलकीतून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मिळून आपला सहयोग देण्याचा निर्णय घेतला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment