Ahmednagar NewsAhmednagar NorthCrimeMaharashtra

परदेशी नागरिकांना मशिदीत आश्रय देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नेवासा : परदेशातील १० व्यक्तींना मशिदीत आश्रय देऊन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघेही मशिदीचे ट्रस्टी आहेत. कॉन्स्टेबल प्रतापसिंह दहिफळे यांनी मंगळवारी याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तीमध्ये म्हटले आहे की, काल मी तसेच, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, उपनिरीक्षक बी. एस. दाते, हेड कॉन्स्टेबल व्ही. यू. गायकवाड, टी. बी. गीते, कॉन्स्टेबल ए. एस. कुदळे, एम. एल. मुस्तफा, एस. बी. गुंजाळ, नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यासाठी रवाना झालो होतो.

नेवासा शहरात गस्त घालत असताना ११ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक डेरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली की, नेवासा शहरात भालदार मशिदीचे ट्रस्टी पठाण जुम्माखान नवाबखान व सलीम बाबुलाल पठाण (दोघे रा. नेवासा खुर्द, ता. नेवासा) यांनी मशिदीत बाहेरच्या देशातील १० व्यक्तींना प्रवेश दिला असून, ते तेथे राहत आहेत.

बातमीवरून आम्ही त्या ठिकाणी गेलो असता, तेथे बाहेरच्या देशातील १० इसम राहत असल्याचे दिसून आले. दोघा ट्रस्टींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची माहिती असतानाही त्याचे उल्लंघन करून जिबुती देशातील ५, बेनिन देशातील १, डेकॉर्ट देशातील ३ व घाना देशातील ३ अशा एकूण १० इसमांना सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र ठेवले. या फिर्यादीवरून दोघा ट्रस्टींविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button