‘या’ तालुक्यात पाच हजार नागरिक होम क्वारंटाईन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे, मुंबई तसेच इतर राज्यात पोटापाण्यासाठी गेलेले तालुक्यातील नागरिक पुन्हा गावाकडे परतले आहेत. अशा परतलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली असून, ग्रामीण भागात ६७५९ नागरिक परत आले आहेत.

यापैकी ५०८९ नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले आहेत. पोलिस पाटलांमार्फत या नागरिकांवर आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. जामखेड तालुक्यातील दिघोळ, जातेगाव, साकत, खर्डा, पिंपरखेड, नान्नज, जवळा, सोनेगाव, अरणगाव, पाटोदा, हळगाव पिंपळगाव उंडा या परिसरातून नागरिक पोटापाण्यासाठी व विद्यार्थी शिक्षणासाठी, नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबई, सुरत, इंदूर, भिवंडी, नाशिक, नगर येथे गेले आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे या स्थलांतरित कुटुंबियांचा मोर्चा पुन्हा तालुक्यात आला आहे. ग्रामीण व शहरी भागात स्थलांतरित नागरिकांचा लोंढा पुन्हा तालुक्यात येऊ लागल्याने कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव होण्याचा धोका तितकाच वाढला या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागात बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांवर संशय व्यक्त केला जात आहे.

अनेक गावात याबाबत विरोधाचे सूर उमटले होते. ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला सदर नागरिकांची तपासणी करण्याची मागणी केली. आठ दिवसांपासून महसूल, पंचायत समिती, पोलिस, तालुका आरोग्य विभाग अंग झटकून कामाला लागले. आरोग्य सेविका, आशा स्वंयसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांनी घरोघरी जाऊन बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांच्याशी चर्चा करून ते कोणत्या लोकांच्या संपर्कात होते

का याबाबत माहिती घेतली जात आहे. याशिवाय त्यांच्यात संभाव्य सर्दी, खोकला यासारखी काही लक्षणे दिसून येतात का ? याचे निरीक्षण केले जात आहे जर काही संशयास्पद लक्षणे असतील तर त्यांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवले जात आहे. जर व्यवस्थितपणा वाटला तर त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारला जात आहे व १४ दिवस घरातच वेगळा राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment