धक्कादायक : कोरोनाबाबत माहिती दिल्याच्या संशयावरून खून !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या संशयिताबद्दल कथित माहिती देणाऱ्या व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघड झाली.

रुन्नीसैदपूर पोलीस ठाणे हद्दीतील मधौली गावातील बबलू कुमार (३६) या व्यक्तीने हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून गावातील एका व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती दिल्याची अफवा पसरली होती.

यानंतर २९ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या जबर मारहाणीत बबलूचा मृत्यू झाला. या प्रकरणी बबलूचा भाऊ गुड्डू सिंह याने तक्रार दिल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पाटणा पोलीस मुख्यालयात मिळालेल्या माहितीनुसार बबलू श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत होता. यावेळी काही लोकांनी केलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून ही हत्या झाली असून कोरोना व्हायरसशी याचा काहीही संबंध नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.\

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment