नामदार बाळासाहेब थोरातांच्या कार्यालयात कोरोना रोखण्यासाठी राज्यस्तरीय आपत्कालीन मदत कक्ष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्यभर वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी यशोधन या संगमनेर येथील कार्यालयात स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजितभाऊ थोरात यांनी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने कायम देशहित व नागरिकांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरोना या विषाणूने जगभरासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे. कोरोना हे मानव जातीवरील मोठे भयंकर संकट आहे.

याचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार सर्वत्तोपरी प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याअंतर्गत संगमनेर येथील यशोधन संपर्क कार्यालयात राज्यस्तरीय आपत्कालीन मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 24 तास मदत केली जाणार आहे.

गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका,निवास व्यवस्था,जेवण व्यवस्थेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू न मिळणे, जादा दराने विक्री व उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक समस्या या बाबतच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत.

अशा कामांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये व तातडीने मदत या गरजू नागरिकांना मिळावी याकरता नामदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ही आपत्कालीन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

यशोधन कार्यालय हे संगमनेर तालुका व जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठे मदतीचे केंद्र ठरले असून नागरिकांना मागील सात वर्षात 24 तास मदत मिळत आहे.कोरोनाच्या या काळामध्ये नागरिकांचे प्रश्‍न नोंदवून घेतले जाणार असून त्या प्रश्नांची योग्य विभागामार्फत सोडवणूक केली जाणार आहे.

हे काम 24 तास सुरू असून याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 02425 – 227303,227304 व 9689304304,9689113983 या क्रमांकावर तसेच व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून 9527037037 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन काँग्रेस कमिटी,इंद्रजितभाऊ थोरात व यशोधन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment