कोरोनापासून जीव वाचविण्यासाठी घेतलेल्या औषधामुळे डॉक्टरचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- गुवाहाटी : कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी मलेरियावर प्रभावी ठरणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नामक औषध घेतल्याने एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरचा कथितरीत्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली. उत्पलजित बर्मन असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. उत्पलजित बर्मन हे अनेस्थेशियामधील तज्ज्ञ होते. कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ४४ वर्षीय बर्मन यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेतले.

यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन बर्मन यांचा मृत्यू झाला; परंतु या औषधामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सद्य:स्थितीत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करण्यात येत आहे. औषध घेतल्यानंतर बर्मन यांनी आपल्या एका सहकाऱ्याला व्हॉट्सॲपवरून अस्वस्थ वाटत असल्याचे म्हटले होते.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment