कोरोनाविरोधी लढ्यात ९५ पोलीस अधिकारी आणि ४६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  चीनमध्ये कोरोनाविरोधी लढ्यात ९५ पोलीस अधिकारी आणि ४६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. चिनी वृत्तसंस्थेने शनिवारी याबाबतची माहिती दिली. या महारोगराईिवरोधी लढ्याचे बळी ठरलेल्या अधिकाऱ्यांबाबत चीनने प्रथमच खुलासा केला आहे.

चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ८१ हजार ६३९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अवघी दीड हजार आहे. त्यापैकी ३३१ लोकांची स्थिती गंभीर आहे.

७६ हजार ७५५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनामुळे युरोपातील इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक लोक दगावले आहेत; परंतु अमेरिकेची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ८० हजारांपर्यंत पोहोचली आहे.

अमेरिकेत अधिकाधिक लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचवेळी कोरोनाच्या बळींची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत २४ तासांत सरासरी हजार लोकांचा मृत्यू होत आहे.

शुक्रवारी एकाच दिवसात १४८० जणांचा मृत्यू झाला, तर ३२ हजार नवे रुग्ण आढळले. बळींचा आकडा ७ हजार ४०३ झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये परिस्थिती सर्वाधिक भीषण आहे.

दुसरीकडे युरोपातील बळींचा आकडा शुक्रवारी ४० हजारांपुढे गेला. इटलीमध्ये सर्वाधिक १४ हजार ६८१ जण कोरोनामुळे दगावले आहेत, तर स्पेनमधील बळींचा आकडा ११ हजार ७४४ वर पोहोचला आहे. स्पेनमध्ये एका आठवड्यापासून सरासरी ९०० लोकांचा मृत्यू होत आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment