कोरोनाच्या संकटात संजीवनीचे सॅनिटायझर बाजारात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाच्या संकटात शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील डिस्टिलरीने ‘क्ि­लन ऑल’ या हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती केली आहे, अशी माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.

सॅनिटायझरच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हे बोलत होते. आसवनी प्रकल्प आणि ज्या साखर कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प आहेत, अशा साखर कारखान्यांनी सॅनिटाझरची निर्मिती करावी, असे आवाहन शासनाने केले होते.

त्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वप्रथम हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. हे उत्पादन संजीवनी सॅनिटायझर नावाने बाजारात आणले आहे.

याप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सुरक्षा अधिकारी प्रकाश डुंबरे आदी उपस्थित होते. यावेळी कोल्हे म्हणाले की, ही आपत्ती मोठी आहे.

त्याचे निवारण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या नॉर्म्सप्रमाणे संजीवनी हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे त्याची निर्मिती करताना खूप अडचणी आल्या.

याबाबतच्या परवानग्या तसेच कच्चा माल बूच, रंग येथे उपलब्ध होत नाही. मुंबईतून हा कच्चा माल मिळवताना कष्ट पडले, असे कोल्हे म्हणाले.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment