Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना वेळ मिळाला ‘या’ दिवशी करणार अहमदनगर दौरा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. 

दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अद्याप अहमदनगर जिल्हा दौरा केला नव्हता. 

राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवार दि.7 एप्रिल रोजी जिल्हा दौ-यावर येणार आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10-30 वाजता पुण्याहून जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आगमन व कोरोना विषाणू (कोव्‍हीड 2019) प्रतिबंधात्‍मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक.

दुपारी 12 वाजता बाहेरील राज्‍यातील / जिल्‍हयातील गरजू कामगार यांच्‍याकरिता प्रशासनाने उपलब्‍ध केलेले निवारा केंद्रास भेट.

दुपारी 12.30 वाजता राखीव ( शासकीय विश्रामगृह,अहमदनगर ). दुपारी 1.30 वाजता मोटारीने पुणे मार्गे मुंबईकडे प्रयाण.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close