Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtraPoliticsSpacial

थोरांतासारख्या काँग्रेसच्या नेत्याने सत्तेच्या धुंदीत असे काही करणे योग्य नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- कोरोनाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला राजकारण करायचे नाही. मात्र, थोरांतासारख्या काँग्रेसच्या नेत्याने सत्तेच्या धुंदीत राहुन प्रसिद्धीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर बेताल टिका योग्य नाही.

नशिबाने व अपघाताने सत्तेत आलेल्या थोरातांनी महसुलमंत्री पदाला साजेसे काम करावे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांवर टिका करण्यापूर्वी थोरातांनी विचार करायला हवा.

देशापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेच्या जिवीतासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मोदींच्या एका आवाहनाने संपूर्ण देशातील जनता घरात बसली आहे.

जनतेने मोदींना दिलेल्या प्रतिसादामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न विविध यंत्रणांनी सुरू केला आहे. देशातील जनता संकटाच्या काळात एकसंघ राहाते हे मोदींच्या एका आवाहनामुळे सिध्द झाले.

जनतेत संकटाचा सामना करण्याची स्फूर्ति निर्माण होण्यासाठी रविवारी दिवे लावा हा मंत्र मोदींनी दिला.

मात्र, ना. थोरातांनी आपल्याच सत्तेतील सहयोगी पक्षतील रोहित पवार यांच्या सल्ल्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करत मोदींवर टिका करून राजकारण सुरू केले आहे, असे गोंदकर यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button