आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या सहकार क्षेत्रातील ऊत्कृष्ट बँकेने कोरोनाविरोधात लढ्यासाठी दिली ही मदत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोना प्रतिबंधासाठी आता निकराचा लढा सुरू झाला आहे. सरकार पूर्ण ताकदीने त्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोना प्रतिबंधासाठीच्या या लढ्यात समाजिक उत्तरदायीत्व नेहमीच जपणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देखील मदतीसाठी सरसावली नसेल तर नवल!

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील २५ लाख रूपयांची मदत कोरोना संसर्गा संदर्भात उपायायोजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस धनादेशाद्वारे दिली आहे.

संपूर्ण आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची सहकार क्षेत्रातील ऊत्कृष्ट बँक म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकिक आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक जाणीव ठेऊन अडचणीच्या काळात राज्य सरकारला नेहमी भरीव मदत केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार असा २५ लाख रुपयांचा धनादेश अहमदनगरचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी माजी मंत्री तथा बँकेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले, संचालक रावसाहेब शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जनसंपर्क अधिकारी भारत सोले पाटील आदी उपस्थित होते.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment