आनंदाची बातमी : ‘त्या’ ४१ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  शिर्डी : राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाथरे, हनुमंतगाव व हसनापूर या गावातील ४१ व्यक्तींचे स्त्राव तपासणीत सर्वांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे.

यातील ३२ व्यक्तींना शिर्डीत साई आश्रम फेज- २ धर्मशाळेत विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित नऊ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षामध्ये एकूण ५५ व्यक्ती दाखल करण्यात आल्या आहेत.

विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. संबंधित गावाच्या परिसरात गृहभेटीद्वारे शंभर टक्के तपासणी करून नागरिकांकडून आवश्यक असलेल्या माहितीचे संकलन करण्यात येत आहे.

गावांमध्ये जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकानातून मासिक नियतन नियमित देण्यात येत आहे. अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.

वैद्यकीय औषधे, जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून, त्याची वाहतूक सुरळीतपणे होत असल्याची माहिती तहसीलदार हिरे यांनी दिली.

साथ रोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार प्रशासनाने कटेनमेंट ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये १३ पथकांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके तपासणीचे कार्य करत आहेत. साई संस्थानच्या वतीने पथकाला तपासणीसाठी इन्फ्रारेड थर्मामीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.से आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment