Ahmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar South

यांना काही काळजीच नाही : सोशल डिस्टंन्सिगची ऐशी तैसी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-   जेऊर : संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग निर्णयाची पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

नगर तालुक्यातील जेऊर परिसरात काही ठराविक नागरीकांमुळे लॉकडाऊनच्या काळात संपुर्ण गाव वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. विनाकारण चकरा मारत राहणे, घोळका करुन गप्पा मारणे असे प्रकार सुरु आहेत.

पोलिसांनी अडविलेच तर दूध, किराणा, औषधाच्या नावाखाली सुटका करुन घेणे हे उद्योग यांच्याकडुन सुरु आहेत. ग्रामीण भागात बहुतेक गावांनी हेच चित्र पाहवयास मिळत आहे.

परिसरातील छोट्या छोट्या गावात तर लोक सर्रासपणे झाडाखाली मोठ्या घोळक्याने दिवस दिवस गप्पा मारत बसलेले दिसतात. तर तरुण मंदिर, पारावर गप्पा मारताना दिसून येतात.

आठवडे बाजार बंद असले तरी दररोज विक्रीसाठी येत असलेल्या शेतकऱ्यांकडे भाजीपाल्याची खरेदी करताना गर्दी होत आहे. अनेक गावांनी दारुची विक्री सुरु आहे. जेऊर, पांढरीपूल, खोसपुरी परीसरात तर चार पट चढ्या भावाने दारुची विक्री होत आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडुन होत आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close