अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना मुळे काम नसल्याने विधवा महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोखण्यासाठी सर्वत्र लाॅकडाऊन सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नाही.

हाताला काम नसल्याने जगायचे कसे या विंवचनेतून दोन लहान मुले असलेल्या मजूर विधवा महिलेने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सुदैवाने एका कार्यकर्त्यांच्या लक्षात ही घटना आल्याने तो अयशस्वी ठरला व या महिलेचा जीव वाचल्याची घटना सोमवारी अकोल्यात घडली.

कोरोनाच्या या संकटात स्वतःच्या जिवाची व आपल्या लहान दोन मुलांची कदर न करता स्वतःच्या गळ्याला फास लाऊन स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न या महिलेने केला.

नवरा नाही. मुले शिक्षण घेतात. लोकांच्या चार घरची धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता. मात्र कोराेनाच्या या परिस्थितीत घरीच बसायला लागले,

त्यामुळे हाताला काम नाही. पर्यायाने घरात खायला धान्य नाही. म्हणून स्वतःच्या गळ्याला फास लाऊन ही महिला जीवन संपवण्याच्या प्रयत्नात

असतानाच शेजारी राहणारे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद रुपवते यांच्या ही घटना लक्षात आली.

त्यांनी महिलेच्या घराचा आतून बंद करण्यात आलेला दरवाजा तोडून या महिलेचा जीव वाचवला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment