Breaking

धक्कादायक : एकाच कुटुंबातील चार जण संशयित !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील निघोज येथील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोना संशयित म्हणून ताब्यात घेत त्यांना नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

अहवाल गुरूवारी येण्याची शक्यता आहे. या कुटुंबातील एक सदस्य पनवेल येथे टॅक्सी ड्रायव्हर होता.

काही दिवसांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने संपूर्ण कुटुंब निघोज येथे राहात होते.

सध्या हा चालक निघोज येथील एका टँकरवर काम करत होता. हा टँकर निघोज येथून मुंबईला जात होता.

घरातील ४ वर्षांच्या लहान मुलीला सर्दी आणि तापाचा त्रास झाल्याने निघोज येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते.

श्वास घेता येत नसल्यामुळे व मुलीच्या आईलादेखील सर्दी आणि कोरडा खोकला,

इतरही सदस्यांना काही प्रमाणात त्रास असल्यामुळे सर्वांनाच तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले,

अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close