Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreaking

स्वस्त धान्य दुकानांवर कोरोना संसर्ग होण्याचा धोका

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- स्वस्त धान्य दुकानावर ठेवलेल्या पॉस मशीनवर अंगठा ठेवल्याशिवाय कुपन धारकांना धान्य मिळत नाही. परंतु आता प्रत्येक माणसाने पॉस मशीनवर हात ठेवून त्यामधून कोरोना संसर्गाचा धोका वाटल्याने शासनाने त्या मशीनवर शिधापत्रिका धारकाच्या आंगठ्या ऐवजी दुकान चालकाच्या अंगठ्यावर धान्य देण्यास परवानी दिलेली आहे.

ही बाब एका दृष्टीने योग्य झाली. ज्यांना धान्य वाटप केले त्यांची रजिस्टरवर नोंद करण्याच्या सूचनाही धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.दुकानदारांनी पॉस मशीनवर स्वत:चा अंगठा देऊन दिलेले धान्य अधिकृत इसमाला मिळणार कि नाही ? याची शास्वती नाल्याने अनेक लोक धान्य घेऊन जाऊन धान्य मिळाले नाही, अशा तक्रारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे धान्य दुकानदारांच्या अडचणी वाढणार आहेत. धान्य दुकानदाराने ज्याला धान्य दिले आहे, त्याचे नाव नोंदवून एकाच पॅडद्वारे रजिस्टरवर आंगठे घेतले त्तरी कोरोनाच्या संसर्गाचा धोका संभवतो. जे रजिस्टरवर सह्या करणार आहेत ते देखील एकाच पेनने सह्या करतील व त्यातूनही संसर्ग होऊ शकेल.म्हणून प्रत्येक धान्य दुकानावर साबण आणि पाणी ठेवून धान्य नेणाऱ्या व्यक्तीने स्वच्छ हात धुवून, मगच सह्या किंवा आंगठे रजिस्टरवर द्यावेत.

शिवाय धान्य नेण्यासाठी येणाऱ्याने मास्क किंवा उपरण्याने तोंड बांधूनच धान्य नेण्यासाठी यावे. धान्य दुकानापुढे गर्दी न करता एक मीटरचे शारीरिक अंतर राखावे. अशा सूचना सर्व धान्य दुकानदारांना शासनातर्फे देण्यात याव्यात.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close