Ahmednagar CityAhmednagar NewsCorona Virus Marathi News

‘ते’ दोघे कोरोना संशयीत रुग्णालयात पुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोना व्हायरसची  चाचणी करण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातून आलेले दोघे कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयात पुन्हा दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत हे दोघे मंगळवारी सायंकाळी गायब झाले होते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

त्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांच्या घशातील स्त्राव काढून तो तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविण्यात येतो. या ठिकाणी मंगळवारी श्रीरामपूरचे दोघे कोरोना संशयीत आले होते.

त्यांनी कोरोनाची तपासणी करावयाची सांगत त्यासाठी केस पेपर काढला.मात्र, ऐनवेळी उपस्थित डॉक्टरांना वडिलांना घेऊन येतो, असा बहाणा करत जिल्हा रुग्णालयातून काढता पाय घेतला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close