कोरोना व्हायरसची संपूर्ण जगात पसरली दहशत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम :- कोरोना व्हायरसची संपूर्ण जगात दहशत पसरली आहे. या प्राणघातक विषाणूने आतापर्यंत जगभरातील जवळपास १ लाख जणांचा बळी घेतला असून, १६ लाखांहून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे.

विशेषत: अमेरिका व युरोपात हे वैश्विक संकट टोकाला पोहोचले आहे; पण शुक्रवारी या दोन्ही क्षेत्रांतील बळींचा आकडा घसरल्याने आता या विषाणूची दहशत काहीशी कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

कोरोनामुळे जगभरात जवळपास १ लाख लोकांचा बळी गेला आहे. तर साडेसोळा लाखांहून अधिक जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. आजमितीस ११,५६,९८१ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू असून,

यातील ९६ टक्के म्हणजे ११,०७,७८८ रुग्णांत कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. तर उर्वरित ४९,१९३ जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

अमेरिकेत बुधवारच्या १,९७३ बळींच्या तुलनेत गुरुवारी १,७८६ बळी गेले. इटलीनंतर अमेरिकेत सर्वाधिक १६,६९७ जणांचा बळी गेला असून, ४,६८,८९५ जणांना त्याची लागण झाली आहे.

Leave a Comment