अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :-  श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर येथील २८ वर्षांच्या गतिमंद युवकाचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.

या युवकाला ४ एप्रिलला श्वसन व फिटचा त्रास होऊ लागल्याने हरेगाव येथे डॉक्टरकडे दाखवण्यात आले. नाऊर येथील एका डॉक्टरनेही घरी येऊन उपचार केले होते. बालपणापासून आजार असल्याने त्याला लोणी येथे पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले.

तेथून त्याला नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथून पुण्यात ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ५ तारखेला त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे पत्र प्राप्त झाले. या तरूणाच्या वडिलांनाही तेथेच क्वारन्टाइन करण्यात आले आहे.

या तरूणाचे वजन खूप होते. पाच-सहा महिन्यांपासून तो आजारी होता. गेल्या पंधरा दिवसांपासून तो जास्तच आजारी झाला. त्याला जेवणही जात नव्हते, अशी माहिती मिळाली. पुण्यातच अंत्यसंस्कार होतील.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे म्हणाले, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. आतापर्यंत ज्या शहरातील रुग्णालयात रुग्णाचे निधन झाले, त्याच शहरात अंत्यसंस्कार झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment