Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर ब्रेकिंग : १६ जणांना प्रशासनाने तपासणीसाठी पाठविले…आता या तालुक्यात कोरोना पोहचतोय ?

पाथर्डी : दिल्लीच्या मरकजला तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक युवक व त्याच्या कुटुंबातील संपर्कात आलेले १५ जण असे १६ जणांना तालुका प्रशासनाने ताब्यात घेवुन अहमदनगर येथे तपासणीसाठी शुक्रवारी पाठविले आहे.

दिल्लीच्या मरकजचे कनेक्शन पाथर्डीतल्या माणिकदौंडीत पोहचले असल्याची भावना नागरीकांमधे वाढत आहे. माणिकदौंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील एक जेष्ठ नागरीक खोकल्याचा त्रास होत असल्याने उपचारासाठी गुरुवारी आले होते.

तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय जायभाये यांनी उपचार करताना अधिक माहिती घेतली असता मुंबई येथुन एक जण आल्याचे समजले.

यावरुनच शुक्रवारी पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, नायब तहसिलदार पंकज नेवसे यांनी महसुल, पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासह माणिकदौंडी येथे जाऊन कसुन चौकशी केली.

माणिकदौंडीचा एक युवक मुंबई येथे व्यवसायानिमित्त राहतो. तो मुंबईवरुन दिल्लीच्या तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाला गेला होता. १३ मार्च रोजी तो मुंबईत आला व तेथुन तो २६ मार्चला माणिकदौंडी येथे आल्याचे तो सांगतो.

गावाच्या बाहेर डोंगराच्या कडेला या युवकाचे कुटुंब राहते. त्याचे वडील व भावाला खोकला येत असल्याचे समजते. त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील पंधरा जणांना व या युवकाला शुक्रवारी ताब्यात घेवुन अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

या घटनेमुळे माणिकदौंडी परिसरात खळबळ उडाली आहे. माणिकदौंडी ते मरकज या कनेक्शनमुळे आता तालुक्यात कोरोना पोहचतोय का असा प्रश्न पाथर्डीकरांना पडला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close