आता पोलिसांची ड्रोनद्वारे नजर…अनावश्यक बाहेर पडू नका अन्यथा गुन्हे दाखल होतील !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जामखेड :- शहरातील सर्व प्रमुख मार्गावर राज्य राखीव पोलीस दल व जामखेड पोलीस यांनी एकत्रित संचलन करून शासनाच्या सुचनेचे पालन करण्याची माहिती दिली. तसेच अफवा, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी दिला.

जामखेड शहरात मागील आठ दिवसात आढळलेले सहा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण तसेच धार्मिक भावना दुखावल्यामुळे दाखल झालेला गुन्हा, धार्मिकस्थळात विनापरवाना थांबलेल्या परदेशी नागरिकांवर दाखल झालेला गुन्हा या पार्श्वभूमीवर शहरात मागील तीन दिवसांपासून राज्य राखीव पोलीस दल, जामखेड पोलिस व तीन अधिकारी शहरात संचलन करीत आहेत.

यावेळी नागरिकांना घराबाहेर पडू नका, घरातच थांबा आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, वारंवार हात साबण अथवा सॅनिटायजर लावून धुवा, घाबरून जाऊ नका, अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडताना मास्क लावा, बॅकेतून पैसे काढताना पाच फुटाचे अंतर ठेवा, अनावश्यक बाहेर पडू नका अन्यथा गुन्हे दाखल होतील आदी सुचना संचलनावेळी दिल्या गेल्या.

धार्मिक तेढ, अफवा पसरवणारे व शासनाच्या सुचनेचे पालन न करणाऱ्यांवर ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जात असून कोणी आढळल्यास त्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार येईल असे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव म्हणाले.

या संचलनावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गिते, शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment