वापरलेले हॅन्डग्लोज रस्त्यावर ! नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहाता :- तालुक्यातील लोणी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्कारंटाईनसाठी शिर्डी येथील साईआश्रम फेज 2 मध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

याठिकाणी वापरून फेकून दिलेले हॅन्ड ग्लोज बाजूला असलेल्या रस्त्यावर आढळून आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा प्रकारचे कृत्य करून रोगाला आमंत्रण देण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या निमगाव येथील साईआश्रम फेज 2 मध्ये राहाता तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील सुमारे 53 व्यक्तींना चौदा दिवसासाठी क्कारंटाईन करण्यात आले आहे.

याठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या लोकांसाठी पोलीस सुरक्षा तसेच स्वच्छता कमकुवत पडत असल्याने येथील रस्त्यावर वापरण्यात आलेले हॅन्ड ग्लोज फेकून दिलेल्या परिस्थितीत मिळून आले. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

हा खोडसाळपणा येथील नागरिकांच्या जिवावर बेतू शकतो. दरम्यान येथील स्वच्छता कर्मचार्‍यांना देखील खबरदारीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

एकंदरीतच सदरील व्यक्ती क्वारंटाईन असून त्यांना चौदा दिवसासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असले तरी सुद्धा आसपासच्या नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment