दारू ऑनलाइन मिळणार ? जाणून घ्या सत्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- लॉकडाऊनच्या काळात  वाईन शॉप्स, बार, परमिट रूम बंद आहेत. त्यामुळे रोज दारू पिणार्यांचे हाल होत आहेत , दारू मिळविण्यासाठी पाताळात जाण्याचीदेखील अनेकांची तयारी आहे.

अशा तळीरामांची ऑनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऑनलाइन वाईन, ऑनलाइन लिकर, अशा नावाखाली घरपोच दारू पोचविण्याचे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात फ्रॉड सुरू आहे.

अशा प्रकारे कोणालाही ऑनलाइन दारूविक्रीची परवानगी देण्यात आलेली नाही. जनतेने अशा प्रकारच्या कोणत्­याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्­य उत्­पादन शुल्­क विभागाने केले आहे.

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३

व व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment