Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrimeMaharashtraPolitics

खासदार सुजय विखेंनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘त्या’ युवकावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना

पाथर्डी :- तालुक्यातील माणिकदौंडी येथील युवकाने मरकजला (दिल्लीला) गेल्याची माहीती लपविली ही गोष्ट गंभीर आहे. सामाजिक आरोग्य सुरक्षा धोक्यात आणली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आणखी कोणी मरकजला गेलेले असतील व ते गावी आलेले असतील तर त्यांनी स्वत:होवुन प्रशासनाकडे आले पाहिजे असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

शनिवारी पाथर्डी येथे तहसील कार्यालयात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थीतीमधे झाली. प्रांतअधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक रत्नपारखी,

गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, अभय आव्हाड. माजी उपनराध्यक्ष बंडु बोरुडे, ॲड. प्रतिक खेडकर आदी उपस्थीत होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा.विखे म्हणाले, माणिकदौंडीचे प्रकरण गंभीर आहे. मरकजला जाणे चुकीचे नाही मात्र आल्यानंतर माहीती दडवुन ठेवणे गुन्हा आहे. संबंधितावर गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात राहुन काळजी घेणे महत्वाचे आहे. आमच्या हेल्पलाईनवर पाथर्डी तालुक्यातून अनेक सुचना व मागण्या करण्यात आल्या, त्या गरजू लोकांना जनसेवा फाऊंडेशन मदत देत आहे.

संकटात मी जनतेसोबत आहे. मिरी येथे अन्नधान्य वाटप करुन आज सुरुवात केली आहे. जनसेवा फांऊडेशन मदतीचा हात पुढे करीत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close