Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

अहमदनगरकरांसाठी आनंदाची बातमी : आता सर्वांनाच मिळणार पेट्रोल !

अहमदनगर Live24 :-  अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल देण्याबाबतच्या आदेशात जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी यांनी अखेर दुरूस्ती केली असून आता उद्यापासून दररोज पहाटे ५ ते ९ या कालावधी सर्वाना पेट्रोल दिले जाणार आहे.

यापूर्वीच्या आदेशात जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ दुरूस्ती केली असून अत्यावश्यक सेवेतील पोलिस, वैद्यकीय, पत्रकार, बँकींग- पतसंस्था कर्मचार्‍यांसह शेतकरी- दूध उत्पादक यांच्या खासगी वाहनांना पेट्रोल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. दि. 14 रोजी काढण्यात आलेल्या आदेशात जिल्हाधिकारी दि. 15 पासून अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांना पेट्रोल मिळणार नसल्याचे जाहीर केले होते.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही पेट्रोल-डिझेल दिले नाही. यामुळे दूध उत्पादक, शेतकरी, सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अनेकांनी पेट्रोल-डिझेल नसल्यास अनेक अडचणीचा सामना करावा लागेल, याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

आता जिल्हाधिकार्‍यांनी सुधारीत आदेश काढून अत्यावश्यक सेवेतील पोलिस, वैद्यकीय, पत्रकार, बँकींग आणि शेतकरी- दूध उत्पादक यांच्या खासगी वाहनांसाठीच्या पेट्रोल विक्रीचा विषय मार्गी लावला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close