Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

एकाच दिवशी दोन मृत्यू, तालुक्यात उडाली खळबळ

कोपरगाव : शहरातील कोरोना बाधित आढललेल्या ६० वर्षीय महिलेचा मंगळवारी (दि. १४) पहाटे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

या महिलेला श्वसनाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होत होता. तिला काही दिवसापूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने बूथ हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ही महिला मयत झाली.

या महिलेच्या मृत्युमुळे जिल्हयात कोरोनाचा दुसरा बळी गेल्याची घटना घडली आहे.सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली होती.

तसेच शिंगणापूर येथील ६५ वर्षीय महिलेला तीन दिवसांपूर्वी संशयित कोरोना म्हणून नगरला जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. या महिलेचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला.

तिच्यावर उपचार होऊन ठिक झाल्यानंतर तिला रुग्णालयात क्वारंटाईनसाठी सोमवारी (दि. १३) कोपरगाव येथे पाठविण्यात आले होते.

सारी (सिव्हिअरली अँक्युट रेस्पायरेटरी इलनेस)च्या आजाराने मंगळवारी (दि. १४ एप्रिल) रोजी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शिंगणापूर येथील महिलेचा मृत्यू झाला.

सारी आणि कोरोनाचे लक्षणे सारखी असल्यामुळे व एकाच दिवशी एका महिलेचा कोरोना तर दुसऱ्या महिलेचा सारी सदृश आजाराने मृत्यू झाल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close