अहमदनगर जिल्ह्यात ‘सारी’ची चिंता वाढली !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- जिल्ह्यात सारी रोगाने मात्र वाढवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सारीचे ४२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २८ कोरोना रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे.

१३ एप्रिलनंतर एकही रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे सारीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधित नऊ जणांचे लाळेचे नमुने १४ दिवसांनंतर तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरूवारी पाठवलेल्या ३३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत.

शुक्रवारी आणखी २४ व्यक्तींचे नमुने पाठवण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत १,२३५ व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठवले.

१,१६६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. ज्या अहवालांची प्रतीक्षा आहे, त्यामध्ये १४ दिवस पूर्ण केलेल्या दोघा परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून पाठवण्यात आलेल्या अहवालात १४ दिवस पूर्ण केलेल्या ९ कोरोनाबाधित व्यक्तींच्या स्त्राव चाचणीचा समावेश आहे. जिल्ह्यात ११ एप्रिलपासून आजपर्यंत सारीचे ४२ रूग्ण सापडले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment