अहमदनगर ब्रेकिंग : १९ व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

आज आणखी ३० जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, नेवासे येथील एका व्यक्तीचा १४ दिवसा पूर्वीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले होते.

ही व्यक्ती तब्लीगी जमातच्या संपर्कात असल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. १४ दिवसानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधीताच्या संख्येतही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता २९ झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment