Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर गुड न्युज : जिल्ह्यातील आठ रुग्ण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 :- अहमदनगर करांसाठी आनंदाची बातमी आहे, अहमदनगर मध्ये  उपचार घेणारे आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता लवकरच त्यांची सुट्टी होणार आहे. 

जामखेड येथील ०४ कोरोना बाधीत व संगमनेर शहरातील 3 आणि व आश्र्वी बुद्रुक येथील एक अश्या एकूण ८  रुग्णांचा १४ दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असून 

या आठ व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुढील चौदा दिवस  विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

हे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हापासून १४ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांचे परत चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. यात त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील 29 रुग्णांपैकी आतापर्यंत 12 जण कोरोनामुक्त झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, या आठ जणांवर नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या रुग्णांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला.

कोरोनामुक्त झाल्याने आता सोडण्यात येणार आहे.नगर शहरात आणि जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत नसल्याने ते दिलासादायक आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close