Live Updates :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे, उद्यापासून काही नियमांमध्ये शिथीलता आणण्यात येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधून माहिती दिली

शासनातर्फे काही नंबर जाहीर करण्यात आले आहेत. महिलांसाठी १०० नंबरवर सहकार्य उपलब्ध असणार आहे. १८०० १२० ८२००५० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. १८०० १०२ ४०४० हा क्रमांक आदिवासी विभागाच्या  सहकार्याने सुरु आहे. 

६६,६९६ चाचण्या झाल्या आहेत. ९५ टक्के लोकांच्या टेस्ट निेगेटीव्ह आल्या आहेत. साधारण ३६०० हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. साधारण ३५० जण बरे होऊन घरी गेले आहेत. 

  • धीर सोडू नका. हे संकट टळेल. लढायचं आणि जिंकायचंच.येत्या काही दिवसात मजुरांसाठी काहीतरी मार्ग निघे
  • आमची पिढी तुमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी खंबीर आहोत.
  • अनेक लहान मुलं आपले साठवलेले पैसे सहाय्यता निधीला देण्यासाठी कौतुक
  • ज्येष्ठांची काळजी घ्या
  • घरोघरी असलेल्या अँटी कोरोना पोलिसांचं कौतुक
  • नागरिकांनी कृपया कारणाशिवाय घराबाहेर पडू नका.
  • अद्याप कोरोनावर औषध नाही. त्यामुळे आतातरी लांब राहणं हाच उपाय आहे.
  • मला हे संकट संपवायचं आहे.
  • वृत्तपत्रं स्टॉलवर उपलब्ध आहेत. पण रेड झोनमध्ये वृत्तपत्र घरोघरी पोहोचवण्याचा धोका पत्करणार नाही
  • जिल्ह्याच्या सीमा उघडलेल्या नाहीत. फक्त मालवाहतूक होईल
  • शेती, जीवनावश्यक वस्तू इत्यादी सेवांमध्ये खंड नाही
  • हळूहळू शिथिलता आणत आपण पूर्वपदावर येणार आहोत.
  • शिस्त मोडलेली परवडणार नाही
  • माल वाहतूक झाली तरी व्हायरस बंदी राहणारच
  • ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये माफक स्वरुपात काही उद्योगांना परवानगी
  • 20 तारखेपासून मोजक्या उद्योगांना परवानगी
  • कोरोनाला हरवण्यासाठी गाफील राहून चालणार नाही
  • सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे.
  • केंद्राकडून तांदूळ येत असला तरी डाळ आणि गव्हाचा पुरवठा करण्याची मागणी
  • रेशन आणि आरोग्य सुविधांसाठी केंद्र मदत करत आहे.
  • तुम्हाला लागेल ती मदत सरकार द्यायला तयार आहे.
  • संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टरांना आवाहन
  • कोरोना नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना धन्यवाद
  • वेळेत कोरोनावर उपचार शक्य आहे, त्यामुळे लक्षण दिसल्यास स्वतःहून पुढे या
  • कोरोनाचे रुग्ण गंभीर स्थितीतही बरे होऊन परत जात आहेत.
  • लक्षण आढळल्यास समोर या आणि लवकरात लवकर उपचार करून घ्या
  • महाराष्ट्राची संस्कृती एकमेकांच्या मदत करण्याची
  • कोणतेही लक्षण लपवू नका, दुर्लक्ष करू नका.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment