अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील जांभूळवाडी फाट्यावरील निळवंडेच्या कालव्यात अंदाजे ४० वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.

रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृताच्या नाकातून व डाव्या कानातून रक्त बाहेर आले होते. मृताच्या शरीरावर गुलाबी फुलबाहीचा शर्ट, शर्टचे आतुन पांढरे बनियान, बनियनचे आत निळे रंगाचा टी शर्ट,

निळे रंगाची अंडरवेअर, निळ्या रंगाची फुल पॅन्ट असे मृताच्या पेहरावाचे वर्णन आहे. वरील वर्णनाच्या इसमाबाबत कुणाला काही माहिती असल्याचा संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment