Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsHealthMaharashtraSpacial

कोरोनाचे राज्यात एकूण ४६६६ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १८९० (८१ टक्के) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर ३९३ रुग्णांना (१७ टक्के) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण (२ टक्के) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,८७९. लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यातील मुंबई येथील ७ आणि मालेगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. 

मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये (७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३२ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३०३२ (१३९)

ठाणे: २० (२)

ठाणे मनपा: १३४ (२)

नवी मुंबई मनपा: ८३ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: ८४ (२)

उल्हासनगर मनपा: १

भिवंडी निजामपूर मनपा: ३

मीरा भाईंदर मनपा: ७८ (२)

पालघर: १७ (१)

वसई विरार मनपा: १०७ (३)

रायगड: १५

पनवेल मनपा: ३३ (१)

ठाणे मंडळ एकूण: ३६०७ (१५५)

नाशिक: ४

नाशिक मनपा: ६

मालेगाव मनपा:  ८५ (८)

अहमदनगर: २१ (२)

अहमदनगर मनपा: ८

धुळे: १ (१)

धुळे मनपा: ०

जळगाव: १

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: १

नाशिक मंडळ एकूण: १२९ (१२)

पुणे: १८ (१)

पुणे मनपा: ५९४ (४९)

पिंपरी चिंचवड मनपा: ५१ (१)

सोलापूर: ०

सोलापूर मनपा: २१ (२)

सातारा: १३ (२)

पुणे मंडळ एकूण: ६९७ (५५)

कोल्हापूर: ५

कोल्हापूर मनपा: ३

सांगली: २६

सांगली मिरज कुपवाड मनपा:१

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ७ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४३ (१)

औरंगाबाद:१

औरंगाबाद मनपा: २९ (३)

जालना: १

हिंगोली: १

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)

लातूर: ८

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ०

लातूर मंडळ एकूण: १२

अकोला: ७ (१)

अकोला मनपा: ९

अमरावती: ०

अमरावती मनपा: ६ (१)

यवतमाळ: १५

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ४९ (३)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ६७ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ७३ (१)

इतर राज्ये: १३ (२)

एकूण: ४६६६  (२३२)

(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्धकरून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी २३.९७ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close