Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrimeMaharashtra

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा बालकावर हल्ला

संगमनेर :- तालुक्यातील सुकेवाडी महादेव वस्ती येथे शेतात आईच्या पाठीमागे पायी चाललेल्या 6 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.

सुनील नामदेव चव्हाण (वय 6) असे जखमी बालकाचे नाव आहे. सुकेवाडी येथील महादेव वस्तीवर बबन मुरलीधर सातपुते यांच्या स. नं. 180 मधील पंडित क्षेत्रात रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास सुरेखा नामदेव चव्हाण या घराच्या बाजूस शौचालयावरून घराकडे जात असताना आईच्या मागे सुनील चालला होता.

पायात भरलेला काटा काढण्यासाठी खाली वाकला असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सुनील याच्यावर हल्ला केला. बिबट्याने सुनीलच्या मानेला धरल्यावर त्याने जोरात आईला हाक मारली.

ही हाक ऐकल्याने आईने मागे वळून पाहिले तर बिबट्याने मुलाला पकडलेले. तिने आरडाओरड केल्याने बिबट्याने बालकाला टाकून धूम ठोकली. बिबट्याने सुनीलच्या मानेला, हाताला, पायाला खोलवर चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

त्याला तातडीने संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुकेवाडी महादेव वस्ती परिसरात नेहमीच बिबट्यांचा वावर आहे. अनेकवेळा वनखात्याकड़ून पिंजरे लावण्यात आले. परंतु प्रत्येक वेळी बिबट्याने हुलकावणी दिली आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close