अहमदनगर जिल्ह्यातील ६९ जण अडकले राजस्थानमध्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यातील ६९ जण राजस्थानमध्ये दिड महिन्यांपासून अडकले असल्याची माहिती मिळत आहे. नातेवाईकांनी प्रशासनाकडे राजस्थानमध्ये अडकलेल्या नागरिकांना गावी आणण्याची मागणी केली आहे.

नगर जिल्ह्यातील ६९ नागरिक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय येथे सेवक म्हणून सेवा करण्यासाठी गेले होते. सर्व जण ९ मार्च रोजी रेल्वेने दहा दिवस सेवा करण्यासाठी राजस्थानमध्ये पोहोचले.

परंतु देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते सर्व जण दीड महिन्यापासून राजस्थानमध्ये अडकले आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शांतीवन, तलहटी, आबु रोड राजस्थान येथील मुख्यालयात सर्वांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

बहुतेक नागरिक हे शेतकरी व शेतमजुरी करणारे आहेत. नगर शहर व उपनगरातील सुमारे ५० तर नगर तालुक्यातील जेऊर येथील ८, पाथर्डी, श्रीगोंदा, पैठण, राहुरी येथील नागरिकांचा अडकलेल्यांमध्ये समावेश आहे.

जेऊर येथील माजी सरपंच दिलीप बनकर हे राजस्थानमध्ये अडकले असून त्यांनी गावाकडे येण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच राजस्थानमध्ये आमची सर्व सोय करण्यात आलेली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य व राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यात नगर जिल्ह्यातील काही ठिकाणे रेड झोनमध्ये असल्याने राजस्थानमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांसाठी प्रशासन काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment