ही बातमी वाचून तुम्हालाही रडू येईल …व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावे लागले आईचे अंत्यदर्शन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :-  नोकरीनिमित्त केंद्रशासित प्रदेश दमण येथे असलेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील मुलाला उपास्थित राहता आले नाही. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलद्वारे आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ आली.

अंत्यविधीही त्याने व्हिडिओ कॉलिंगद्वारे केला. त्यामुळे उपस्थित अनेकांचे डोळे पानावले. सध्या कोरोनामुळे सर्वजण घरातच आहे. अतिमहत्त्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणे अवघड झाले आहे.

राज्यांसह सर्व जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिआवश्यक कामाशिवाय कुणीही आपल्या घरातून बाहेर न पाडण्याचे सक्त आदेश शासनाकडून देण्यात आले. लॉकडाऊनचा दुःखद अनुभव मंगळवारी कोल्हारकरांना आला.

सोमवारी संध्याकाळी राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील सरूबाई नामदेव चिखले (७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, पाच मुली, दोन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांचा एक मुलगा जालिंदर चिखले नोकरीनिमित्त केंद्रशासित प्रदेश असलेल्या दमन येथे स्थायिक आहे. नातेवाईकांनी त्याला आईच्या मृत्यूची माहिती दिली. त्याने आईला शेवटचे बघावे, अशी सर्व उपस्थितांसह वृद्ध वडिलांची इच्छा होती.

त्यासाठी रात्री अंत्यविधी रोखून धरण्यात आला. मात्र, त्याला प्रत्यक्ष आपल्या आईचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. सर्वतोपरी प्रयत्न करूनही दमन पोलिसांनी त्याला गावाकडे सोडण्यास नकार दिला.

त्यामुळे शेवटी हतबल झालेल्या या मुलाने रात्री दहा वाजता नातेवाईकांना मी येऊ शकत नाही, आपण अंत्यविधी उरकून घेण्याची विनंती केली.

मात्र, माझ्या आईचे शेवटचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. अन् अंत्यविधी उरकण्याची तयारी सुरू झाली. त्याने आपल्या आईचे अंत्यदर्शन साश्रुनयांनी व्हिडीओ कॉलद्वारे आईचे अंतिम दर्शन घेतले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment