पाथर्डीत दारुच्या पार्टीमध्ये भांडण,गोळीबार झाल्याची चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाथर्डी :- शहरालगत असलेल्या माळीबाभुळगाव शिवारातील एका कॉलनीत दारुच्या पार्टीमध्ये भांडण होवून एका निवृत्त सैनिकाला काही जणांनी मारहाण केल्याचे समजते.

यावेळी गावठी कट्यातुन हवेत गोळीबार झाल्याची चर्चा शहरात आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी जावून आले मात्र येथे हाणामारी झाली असल्याचे काही जण सांगत आहेत.

मात्र गोळीबार झाला की नाही हे स्पष्ट झाले नसून याबाबत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यत कोणतीही तक्रारही दाखल करण्यात आलेली नव्हती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळीबाभुळगाव शिवारात एक काँलनी आहे. तेथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही युवक व एक निवृत्त सैनिक यांच्यात दारुच्या पार्टीमुळे वाद झाला.

माजी सैनिकाला मारहाण केल्याची माहिती समजते. यावेळी कुणीतरी गावठी कट्टयातुन हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. पोलिसांना या घटनेबाबत सोशल मिडीयावरुन माहिती समजली.

पोलिस घटनास्थळी जाऊन आले. मारामारी झाली मात्र हवेत गोळीबार झाला की नाही हे सांगता येणार नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. शहरात गोळीबार झाल्याची चर्चा मात्र जोरदारपणे सुरु होती. पोलिस मात्र असे काही घडले नाही असे सांगत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

Leave a Comment