अहमदनगर Live24 :- बीएसएनएलने लॉकडाऊनच्या काळात आपल्या ग्राहकांना इनकमिंग कॉल नि:शुल्क देण्याची घोषणा केली आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल कंपनीने देखील आपल्या ग्राहकांसाठी येत्या ५ मेपर्यंत इनकमिंग कॉल्सची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
बीएसएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान ज्या युजर्सच्या अकाऊंटची वैधता संपणार आहे. त्यांच्या प्लानची वैधता ५ मे २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या सर्व ग्राहकांना ५ मेपर्यंत इनकमिंग कॉलची सुविधा मिळणार आहे. यासाठी त्यांना कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. त्यांच्या फोनवर इनकमिंग कॉल येणे सुरूच राहील. बीएसएनएलने रिचार्ज करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®