१४ दिवसापूर्वी तपासणी केली तेव्हा निगेटिव्ह, नंतर आले रिपोर्ट्स पॉझिटिव्ह ! वाचा संगमनेर मधील धक्कादायक बातमी …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या १४ व्यक्ती पैकी ०४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ३७ वर गेली आहे.

दिनांक ०४ एप्रिल रोजी या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते.

मात्र, १४ दिवसानंतर १० जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व व्यक्तींना संगमनेर येथे संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

या ०४ व्यक्तींचा देखरेखीखाली असण्याचा कालावधी संपणार होता. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यात आली.

त्यात, १० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह तर ०४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते.

दरम्यान, बुधवारी रात्री जामखेड येथील दोघा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती.

त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

कोरोना बाधीत रुग्णाची जिल्ह्यातील संख्या आता ३७ झाली आहे तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २० झाली आहे. सध्या बूथ हॉस्पीटल मध्ये ११ जण उपचार घेत आहेत.तर या बाधीत ०४ रुग्णांना आता तिथे हलवले जाणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment