सरपंच स्वत: भरणार ग्रामस्थांची पाणीपट्टी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- सध्या जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जग अडचणीत आले असून हाताला काम नसल्यामुळे खेड्यातील गरीब जनता अडचणीत आली आहे.

अशा परिस्थितीमध्ये आधार म्हणून वडुले खुर्दचे (ता.शेवगाव) लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब सोपान आव्हाड यांनी एप्रिल व मे या दोन महिन्याची गावातील ग्रामस्थांची पाणीपट्टी स्वत: भरण्याचा निर्णय घेऊन पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात भरली आहे.

वडुले खुर्द गावाची एकूण लोकसंख्या २८०० असून १५० कुटुंब येथे राहतात. या पूर्ण १५० कुटुंबियांची पाणीपट्टी श्री. आव्हाड हे भरणार आहेत.

प्रातिनिधीक स्वरूपात श्रीराम जनार्धन रणमले, सुनील दत्तू आव्हाड या दोन ग्रामस्थांना पाणीपट्टीच्या पावत्यांचे वाटप करण्यात आले असून ग्रामसेवक नवले म्हटले की, सरपंच श्री. आव्हाड यांच्या या निर्णयामुळे गरिबांना मदत होऊन ग्रामपंचायतचे पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट देखील पूर्ण होणार आहे.

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने सर्व उपाययोजना राबविल्या असून सोडियम क्लोराईड फवारणी दोन वेळा केली आहे. सॅनिटाझर व स्वच्छता साहित्य व दिव्यांगाना किराणा मालाचे वाटप केले आहे.

ग्रामपंचायतच्यावतीने कोरोनाबद्दल जनजागृतीचे काम नित्य नियमाने होत असून गुरुवारी भरणारा आठवडे बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

कोरोना प्रादुर्भाव काळात आपत्ती व्यवस्थापन समिती, उपसरपंच बापूसाहेब आव्हाड, सर्व सदस्य, ग्रामसेवक अशोक नवले, तलाठी सोनाली दहिफळे, पोलीस पाटील बाळासाहेब तुकाराम आव्हाड, ग्रा.पं.कर्मचारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत असून सर्वोतोपरी मदत करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment