LifestyleWorld

कोण आहे किम जोंग उनची पत्नी ? जाणून घ्या ही माहिती

अहमदनगर Live24 :- मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची तब्येत बिघडल्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु अद्याप याची अधिकृतपणे खातरजमा झालेली नाही.

आपल्या खास राजकीय शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या किम जोंग उन यांच्या अशा परिस्थितीत असणाऱ्या अनुपस्थितीबद्दलही वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

किम जोंग उन यांचे राजकीय जीवन, त्यांचे निर्णय घेण्याची पद्धती चांगलीच परिचित झाली असून त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज देखील व्हायरल होत असतात. परंतु किम जोंग उन यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रहस्यमय आहे.

त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही अनेक रोमांचकारी घटना सांगितल्या जातात. किम जोंग यांच्या पत्नीचे नाव री सोल-जू असून त्यांना तीन मुले आहेत.

री सोल-जू या पूर्वी चीअरलीडर असल्याची माहिती आहे. असा म्हटलं जात की, री सोल जू यांना पतीसोबत राहण्यास जास्त आवडत. किम यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यात री त्यांच्यासोबतच होती.

एका बातमीनुसार 2005 मध्ये आशियाई एथलीट चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान चीयरलीडरच्या टीममध्ये किम यांची री हिच्याशी भेट झाली. आणि ते तिच्या प्रेमात पडले.

तर काही नागरिकांचं असही म्हणणं आहे की, या दोघांची भेट 2010 मध्ये शास्त्रीय संगीत महोत्सवात झाली होती.त्यांच्या लग्नाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही परंतु २००९ मध्ये त्यांच लग्न झालं असावं असे अनेकांचे मत आहे.

री तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशनसाठी देखील ओळखली जाते. स्टायलिस्ट कपडे आणि महागड्या बॅग याबाबत ती प्रसिद्ध आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button