महाराष्ट्रात जिल्हांतर्गत हालचालींना सुरुवात … वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे Live Updates

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • महाराष्ट्रात 1 लाख 8972 चाचण्या, त्यापैकी 1 लाख 1162 नमुने निगेटिव्ह आले आहेत
  • वरळीतील परिस्थिती हाताळल्याबद्दल केंद्राकडून कौतुक
  • मुंबईत कंन्टोन्मेंट झोन कमी होत आहेत
  • कोरोनाग्रस्तांसाठी मुंबईत ठिकठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत.
  • त्यासाठी खासगी दवाखाने, डॉक्टर यांना सरकारकडून पूर्ण मदत मिळेल
  • कोरोना नसणाऱ्यांची गैरसोय होत आहे
  • सर्व वयाचे कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत. पण त्यासाठी लवकरात लवकर दवाखान्यात दाखल व्हा
  • सर्दी ताप खोकला अंगावर काढू नका, त्वरित फिवर क्लिनिक गाठा
  • रक्तदाब, मधुमेह आणि अऩ्य आजार असणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या
  • महाराष्ट्रात जिल्हांतर्गत हालचालींना सुरुवात
  • गर्दी टाळूनच पुढे जाता येईल
  • सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून शारीरिक अंतर राखा, मनात अंतर नव्हे
  • विषाणू आपल्या संयमाची परीक्षा बघत आहे
  • कोरोनाला रोखण्यासाठी गाफील राहून चालणार नाही
  • वर्दळ वाढवून चालणार नाही.
  • आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा
  • चूक झाल्यास सांगा, सुधारणा सांगा अशी विनंती
  • केंद्राच्या पथकाकडे त्रयस्थपणे निरीक्षण करण्याची विनंती
  • केंद्राचं पथक आपल्याकडे मुक्कामी आहे
  • केंद्राकडे डाळ आणि गव्हाची मागणी
  • कोरोनाची कोणतीही परिस्थिती लपवलेली नाही
  • पण हे सगळं अत्यंत संयमाने करण्याची गरज आहे
  • शक्य होईल तेव्हा अनेक राज्ये एकमेकांच्या मदतीने पुढचा मार्ग काढतील
  • ट्रेन सुरू होणार नाहीत. मजुरांसाठी ज्या सूचना असतील त्या सरकारतर्फे मिळतील
  • त्यासाठी नितीन गडकरी यांचे आभार
  • अशा परिस्थितीत राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या बाजूने उभे राहण्याचं गडकरी यांचं आवाहन
  • केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही जण अजूनही राजकारण करत आहेत
  • मी या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत आहे
  • सरकार एकही प्रयत्न करणं सोडत नाही आहोत.
  • लॉकडाऊनमुळे आपण कोरोनाचा गुणाकार रोखू शकत आहोत
  • लॉकडाऊनचे काही चांगले वाईट परिणाम आहेत
  • प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत
  • कुणाहीवर पटकन संशय व्यक्त करण्याआधी परिस्थितीचा विचार केला पाहिजे
  • हे दोन पोलीस कोरोना युद्ध लढता लढता शहीद झाले आहेत
  • पोलीस आपल्यासाठीच झटत आहेत.
  • आपण सगळेच परीक्षा देत आहोत
  • कोरोना लढ्यात बळी गेलेल्या दोन पोलिसांना श्रद्धांजली
  • आपल्या सेवेसाठी झटणाऱ्यांचा आदर करणं गरजेचं
  • आपल्यासाठी अहोरात्र झटणारे जे कुणी आहेत, त्यांच्यात देव आहे
  • तुम्ही जे संयम पाळताय त्यात देव आहे
  • मुस्लीम धर्मींयांनी आपले नमाज घरातच अदा करावेत, गर्दी करू नका
  • सर्वधर्मियांनी देशकर्तव्याला आणि माणुसकीला प्राधान्य दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
  • पण आपण लढा देत आहोत
  • हे दिवस किंवा हे संकट कुणालाच अपेक्षित नव्हतं
  • दिवस सगळे सारखे झाले आहेत.
  • सर्व दिनदर्शिका दीन झाल्या आहेत.
  • आज नेमकं काय आहे, हे नेमकं लक्षात येत नाही
  • अक्षय्य तृतीया आणि अन्य सणांच्या सर्वांना शुभेच्छा

Leave a Comment