लाॅकडाऊनच्या काळातही प्रवरेची ज्ञानगंगा पोहचली घरोघरी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोणी :- लाॅकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक टाळण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या टिचर्स अॅकॅडमीने तयार केलेल्या अभ्यासक्रमाचा लाभ संस्थेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांसह इतरही शैक्षणिक संस्थांमधील सुमारे २२ हजार विध्यार्थ्यांना झाल्याने ई लर्निग शिक्षणाचा नवा प्रवरा पॅटर्न ४५ हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना संकटाच्या काळात दिलासा देणारा ठरला.

कोव्हीड १९ चे भयग्रस्त वातावरण सुरु झाल्यानंतर सर्वच क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आवाहानात्मक परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रही मागे नव्हते.मागील शैक्षणिक वर्षांचा कालावधी संपत आला असला तरी परिक्षा कशा घ्यायच्या हा प्रश्न होताच.पण शासनाने याबाबत धोरण निश्चित केल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांचे परिक्षांचे टेन्शन कमी झाले असले तरी, जून पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात कशी करायची या प्रश्नाचे उतर शोधण्याची वेळ शिक्षण संस्थांसमोर होती.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने याबाबत अतिशय कमी दिवसात निर्णय करून ई लर्निग सुविधेचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला.यासाठी संस्थेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेवून संस्थेतील प्रवरा टिचर्स अॅकॅडमीच्या माध्यमातून वर्गनिहाय अभ्यासाचा पॅटर्न तयार केला.

अतिशय कमी कालावधीत शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांचे वर्गनिहाय व्हाटसॅप गृप तयार करण्यात आले.दैनंदीन कामाची वेळ ठरवून देण्यात आल्याने माहीती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून ई लर्निगची ही ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरापर्यत पोहचली. ‘वर्क फ्राॅम होम’ या संकल्पनेतून रोज शाळेत भेटणारे शिक्षक विद्यार्थ्याना आॅनलाईन पध्दतीने भेटत असल्याचा उत्साह वेगळा होता.

विषयानिहाय शिक्षणाचा परिपाठ सुरू झाला.होमवर्क मिळत गेला.कोरोना व्हायरसच्या संकटात पुढील शैक्षणिक वर्षांच्या अभ्यासाचे धडे मिळाले.पालकांंसमोरच विद्यार्थ्यांना गृहपाठ मिळू लागल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे गांभीर्य पालकांनाही समजले याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवादातून दिसून आला.

नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम,गृप डिस्कशन आणि होमवर्क यातून ई लर्निग सुविधेचा प्रयोग यशस्वीपणे सुरू झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना संकटाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ई लर्निग सुविधेच्या ग्रामीण भागातील पहील्या प्रयोगाची यशस्वी सुरूवात झाली. .

या सुविधेचा लाभ त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेपुरता सिमीत न ठेवता राहाता राहुरी संगमनेर या तालुक्यातील शिक्षण संस्थांना करून दिला.गणेश विद्या प्रसारक संस्था, शिवाजी शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थांबरोबरच इतरही अन्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली.यासाठी आ.विखे पाटील यांनी पालक कार्यकर्ते यांच्याशी समाज माध्यमातून पत्ररुपी संवाद साधून या ई लर्निग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही केले होते.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील २३ हजार विद्यार्थ्यांसह इतर संस्थामधील सुमारे २२ हजार विध्यार्थ्यांनी या लिंकचा लाभ घेतला असल्याचे निरीक्षणातून दिसून आले.यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी विशेष पाठपुरावा करून या नव्या शैक्षणिक प्रयोगाची यशस्वीता समोर आणली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारे नविन शैक्षणिक वर्ष आता कधी सुरू होणार याची अनिश्चितता आहे.या पार्श्वभूमीवर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने इयत्ता १०वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे नियोजन केलेच.पण याबरोबरीने पुढील प्रवेश परीक्षांकरिता आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमा बरोबरच आवश्यकतेनूसार तांत्रिक महाविद्यालयांच्या परिक्षाही याच पॅटर्नने घेण्याचे नियोजन केले असल्याचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment