जाणून घ्या राज्यासह तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, जळगाव येथे २, सोलापूर शहरात १, तर लातूर येथे १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत.

या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी) मुंबई महानगरपालिका: ५४०७ (२०४), ठाणे: ७३८ (१४), पालघर: १४१ (४), रायगड: ५७ (१) मुंबई मंडळ एकूण: ६३४३ (२२३), नाशिक: १३१ (१२), अहमदनगर: ३६ (२), धुळे: २५ (३), जळगाव: १९ (४), नंदूरबार: ११ (१) नाशिक मंडळ एकूण: २२२ (२२), 

पुणे: १०५२ (७६), सोलापूर: ४७ (५), सातारा: २९ (२) पुणे मंडळ एकूण: ११२८ (८३), कोल्हापूर: १०, सांगली: २७ (१), सिंधुदुर्ग: १, रत्नागिरी: ८ (१) कोल्हापूर मंडळ एकूण: ४६ (२), औरंगाबाद: ५० (५), जालना: २, हिंगोली: ८, परभणी: १ औरंगाबाद मंडळ एकूण: ६१ (५), लातूर: ९ (१), उस्मानाबाद: ३, बीड: १, नांदेड: १ लातूर मंडळ एकूण: १४ (१), अकोला: २९ (१), अमरावती: २० (१), यवतमाळ: ४८

बुलढाणा: २१ (१), वाशिम: १ अकोला मंडळ एकूण: ११९ (३), नागपूर: १०७ (१), वर्धा: ०, भंडारा: ०, गोंदिया: १, चंद्रपूर: २, गडचिरोली: ० नागपूर मंडळ एकूण: ११० (१), इतर राज्ये: २५ (२), एकूण: ८०६८  (३४२).

(टीप- या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८६०३  सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३३.७२ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Leave a Comment