संचारबंदीत ‘असा’झाला भाजपच्या तालुकाध्यक्षांचा विवाह सोहळा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- लग्नपत्रिका छापून झाल्या होत्या, १९ एप्रिल लग्नाची तारीख होती, मात्र २१ मार्चपासून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात संचारबंदी लागू झाली,

त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगर तालुक्याचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांना त्यांचा शुभविवाह घरातच साजरा करावा लागला.

संचारबंदीचे नियम पाळून गर्दी न करता, अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत मास्क लावून आणि सुरक्षित अंतर ठेवून हा विवाह सोहळा पार पडला.

लग्नात होणारा खर्च टळल्यामुळे सदर खर्च कोरोना ग्रस्तांना मदत म्हणून पंतप्रधान सहायता निधीस ५०,००० रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीस ५०,००० रुपये देण्याचा निर्णय भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी घेतला.

या लग्न सोहळ्यास ५ ते ६ हजार लोक येतील असे नियोजन करण्यात आले होते, परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळन्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा विवाह सोहळा

रविवारी ना बँडबाजा, ना वाजंत्री, ना वऱ्हाड असा साध्या पद्धतीने पार पडला, या विवाहसोहळयास फक्त दोन्ही कुटुंबातील प्रमुख उपस्थित होते. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment