प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध 15 पोलिस ठाण्यात तक्रार; ‘हा’ आहे आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध रायपूरसह भिलाई, दुर्ग, बेमेत्रा आणि बिलासपूर आदी पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, अद्याप या तक्रारींवर कोणत्याही पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झालेला नाही.

वास्तविक अरुंधती रॉय यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरूद्ध निंदनीय टीका केल्याचा आरोप आहे. छत्तीसगड येथील सिव्हील सोसायटीच्या कार्यकारिणीने वकील भूपेंद्र जैन यांच्या नेतृत्वात अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अरुंधती रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारवर अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

सोसायटीचे संयोजक डॉ. कुलदीप सोलंकी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रायपूरच्या पाच, दुर्गमधील तीन, भिलाईमध्ये पाच, बिलासपूर आणि बेमेतरा येथील प्रत्येकी एका पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे. याशिवाय सुमारे सहा पोलिस ठाण्यांमध्ये अर्ज प्रलंबित आहेत.

Leave a Comment