धक्कादायक! आधी चिरला बापाचा गळा नंतर दातानं तोडलं गुप्तांग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर: हुडकेश्वरमधील नंदलाल चौकातील विघ्नहर्ता कॉलनी मध्ये शनिवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला. २८ वर्षीय मुलाने बापाचा धारदार चाकूने गळा चिरून खून केला. एवढ्यावरच न थांबता त्याने दाताने वडिलांचे गुप्तांगही तोडले.

इंजेक्शन आणि स्टेरॉइड पावडर न मिळाल्याने मुलाने असे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. विजय पिल्लेवार (वय ५६) असे मृताचे, तर रोहित ऊर्फ विक्रांत पिल्लेवार (२८) असे या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन, आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: विक्रांत हा जिम चालवत असून त्याला स्टेरॉइडचे इंजेक्शन व पावडर घेण्याची सवय आहे.

परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने त्याला पावडर मिळाली नाही. याचा विपरित परिणाम त्याच्या मनावर झाला. तो विकृतीसारखा वागू लागला. त्यानंतर विक्रांतला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

उपचारानंतर त्यास घरी पाठविण्यात आले. रात्री ११ वाजताच्या सुमारास विक्रांत हा आरडाओरडा करायला लागला. त्याने भिंतीला लाथाबुक्क्या मारायला सुरुवात केली. शेजाऱ्यांना शिवीगाळ करायला लागला.

विजय यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. विक्रांत याने वडिलांनाच मारहाण करायला सुरुवात केली. स्वयंपाक घरातील चाकूने विक्रांत याने वडील विजय यांचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात ते खाली पडले.

त्यानंतर विक्रांत याने दाताने विजय यांचे गुप्तांग तोडले व ते बाजूला फेकले. याच दरम्यान विक्रांत याची आई व बहीण अवंती यांनी आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. विक्रांत याचा संताप बघून पोलिसांनी अतिरिक्त ताफा बोलावला. त्यानंतर पोलिसांनी विक्रांत याला पकडले.

दोरीने त्याचे हात बांधून पोलीस ठाण्यात आणले. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन, विक्रांत याला अटक केली आहे.

Leave a Comment