धक्कादायक : सर्व्हेत आढळले ‘सारी’चे दोन रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- नेवासा तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेवासा नगरपंचायत व तालुक्यातील 130 गावांची घरोघर तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सर्व्हे झाला आहे.

या तपासणीत सारीचे दोन संशयित तर करोनाचा प्रादुर्भाव असल्याचे कोणीही आढळून आलेले नाही. तालुक्याची आरोग्य तपासणीची पहिली फेरी उद्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

तहसीलदार रुपेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपायोजना राबवली जात आहे.

आरोग्य विभागातील आशाताई व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरांत सर्वेक्षण करून ताप, खोकला असलेले रुग्ण शोधून त्यांना आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मागील सहा दिवसांपासून या तपासणीला सुरुवात झाली. सहा दिवसांत घरोघरी जाऊन गावागावांत सर्व्हे केला जात आहे. यामध्ये नेवासा शहरापासून सुरुवात करण्यात आली.

नेवासा नगरपंचायत व 130 गावांतील घरांचा येणार सर्व्हे करण्यात आला. यादरम्यान 3 लाखांच्यावर नागरिकांच्या आरोग्यबाबत माहिती घेण्यात आली.

टोका, सलाबतपूर, शिरसगाव, कुकाणा, चांदा, उस्थळदुमाला, सोनई, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 278 जणांच्या पथकाने 3 लाखांच्यावर नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत ‘सारी’चे दोघे संशयित रुग्ण आढळले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment