Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 8590 ! जाणून घ्या तुमच्या शहरासह जिल्ह्यातील माहिती

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख १२ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत

तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे १५,

अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे.

या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एचआयव्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ५७७६ (२१९)

ठाणे: ४० (२)

ठाणे मनपा: २९५ (४)

नवी मुंबई मनपा: १३५ (३)

कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)

उल्हासनगर मनपा: २

भिवंडी निजामपूर मनपा: १४

मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)

पालघर: २५ (१)

वसई विरार मनपा: १२१ (३)

रायगड: १८

पनवेल मनपा: ४३ (१)

ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)

नाशिक: ४

नाशिक मनपा: १९

मालेगाव मनपा:  १२३ (१२)

अहमदनगर: २६ (२)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: ४८(२)

धुळे मनपा: १७ (१)

जळगाव: १८ (४)

जळगाव मनपा: २ (१)

नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)

पुणे:५८ (३)

पुणे मनपा: ९६९ (७४)

पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)

सोलापूर: ६

सोलापूर मनपा: ५९ (५)

सातारा: २९ (२)

पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)

कोल्हापूर: ७

कोल्हापूर मनपा: ४

सांगली: २६

सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)

औरंगाबाद:१

औरंगाबाद मनपा: ५१ (६)

जालना: २

हिंगोली: ८

परभणी: ०

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)

लातूर: १० (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ०

नांदेड मनपा: ३

लातूर मंडळ एकूण: १७ (१)

अकोला: ११ (१)

अकोला मनपा: १८

अमरावती: १

अमरावती मनपा: २१ (७)

यवतमाळ: ६२

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: १३५ (९)

नागपूर: ४

नागपूर मनपा: १२३ (१)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: ०

चंद्रपूर मनपा: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)

इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ८५९०  (३६९)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५७२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७८६१  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ३२.२८ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button