‘या’ 3 तालुक्यातच राहिले कोरोना रुग्ण, बाकी अहमदनगर जिल्हा करोनामुक्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 :- जिल्ह्यात आजवर 43 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 24 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात करोनाबाधित एकूण 17 रुग्ण असून हे सर्व बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

त्यात जामखेड तालुक्यातील 11, संगमनेरमधील चार, तर नेवाशाती दोन रुग्णांचा समावेश आहे. जामखेड, संगमनेर, नेवासे वगळता जिल्हा करोना मुक्त झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, राहुरी, अकोले तालुक्यात तर एकही रूग्ण अद्यापपर्यंत आढळलेला नाही. 

सध्या एकट्या जामखेड शहरातील रुग्णांची संख्या 17 झाली आहे. त्यातील 11 जणांवर उपचार सुरू आहेत. संगमनेर येथे एकूण आठ करोनाबाधित आढळून आले होते. त्यातील चौघे करोना मुक्त झाले आहेत.

नेवासेत तीन करोनाबाधित होते. त्यातील एक करोना मुक्त झाला आहे, तर एकावर नगर येथील बूथ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. इतर तालुक्यांतील करोनाबाधितांची संख्या कमी झाली असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

त्यानुसार नगर शहरात एकूण 11 करोनाबाधित सापडले होते. त्यात तीन परदेशी नागरिक, तर दोन परप्रांतीयांचा समावेश असून, ते करोना मुक्त झाले आहेत.

राहाता तालुक्यातील लोणी येथे एक, कोपरगाव एक, आष्टी येथे एक, असे जिल्ह्यात एकूण 43 करोनाबाधित रुग्ण आढळे होते. त्यातील सर्वाधिक जामखेड तालुक्यात त्याचा फैलाव झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment