अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांचा कांदा दुबईला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी: किसान विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड वांबोरीने परीसरातील शेतकऱ्यांचा कांदा दुबईच्या बाजारपेठेत रवाना करण्यात आला. वातानुकूलित कंटेनरमध्ये भरून हा माल शुक्रवारी पाठवण्यात आला.

लॉकडाऊनमुळे देशातील बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा विक्रीच्या प्रतिक्षेत शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन किसान विकास शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळणार असल्याचे कंपनीचे संचालक विष्णू ढवळे यांनी सांगितले. वांबोरीतील किसान विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांचा कांदा बाजारभावाने खरेदी केला.

त्याची प्रतवारी करून २० किलोच्या पिशवीत पॅकिंग केला. उत्कृष्ट प्रतिचा कांदा शुक्रवारी दुपारी दुबईला पाठवण्यात आला. वांबोरी परिसराला कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. या परिसरातील कांद्याला देशासह विदेशात मोठी मागणी असते.

सध्या कांदा मार्केट बंद असल्याने कांद्याची मागणी घटली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा कांदा शेतातच नासण्याची वेळ आली होती. या परिस्थितीत वांबोरीतील शेतकरी उत्पादक कंपनीने प्रशासकीय पातळीवर हालचाली करून परीसरातील शेतकऱ्यांचा कांदा निर्यात करण्याचे ठरवले.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण के ल्यानंतर वातानुकूलित कंटेनर वांबोरीत दाखल झाला. कंटेनर पूर्ण भरण्यासाठी शेतकऱ्यांनीच कंपनीला सहकार्य केले. कांद्याबरोबर डाळींब, लिंबू, द्राक्षे यासारख्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा कंपनी प्रशासनाने निर्णय घेतला असून यापुढेही आणखी मोठ्या प्रमाणावर शेती माल निर्यात करणार असल्याचे ढवळे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment